Dialer Screen Change Reason तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलल्या आहेत का? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक अँड्रॉइड युजर्सच्या फोनमध्ये हा बदल झाला आहे. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामागचं कारण लोक जाणून घ्यायला उत्सुक आहेत. याबद्दल सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊ या यामागचं खरं कारण काय आहे.
डायलरची सेटिंग अचानक बदलली?
जाणून घ्या उपाय
हा बदल फक्त त्याच स्मार्टफोन्समध्ये झाला आहे ज्यामध्ये Google Phone App डायलर अॅप म्हणून सेट आहे. Google ने आपल्या Phone अॅपमध्ये Material 3 Expressive Redesign लागू केलं आहे, जे आता युजर्सपर्यंत पोहोचायला लागलं आहे. हा नवीन डिझाइन खास करून अधिक मॉडर्न, सिंपल आणि युजर-फ्रेंडली करण्यासाठी आणला गेला आहे. यात सर्वात मोठा बदल अॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये पाहायला मिळतो.
किपॅड सेक्शनमध्येही बदल
Contacts सेक्शनला आता नवीन नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये आणलं आहे. हे अॅपच्या सर्च फील्डमधून अॅक्सेस करता येईल. या ड्रॉवरमध्ये Contacts शिवाय Settings, Clear call history आणि Help & feedback ऑप्शन्स मिळतात.
Incoming call स्क्रीनलाही नवीन लुक दिला आहे. आता कॉल रिसीव किंवा रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा ऑप्शन मिळेल. हे तुम्ही Settings > Incoming call gesture मधून सेट करू शकता.
In-call इंटरफेसमध्ये बदल
In-call इंटरफेसमध्येही मोठा बदल दिसून येतो. आता कॉलदरम्यानचे बटणं पिल-शेपमध्ये दिसतात आणि निवडल्यावर ते राउंडेड रेक्टॅंगलमध्ये बदलतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे End Call बटण आधीपेक्षा मोठं केलं गेलं आहे, ज्यामुळे कॉल डिस्कनेक्ट करणं सोपं झालं आहे.