gas cylinder price मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असले, तरी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १७ रुपयांची कपात करण्यात आली असून, आता तो रु. १७४७.५० ला उपलब्ध आहे.