Namo Shetkari Yojana 7th Hafta नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती. येथे हप्त्याची संभाव्य तारीख, पात्रता आणि नवीनतम अपडेट्स जाणून घ्या.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.Namo Shetkari Yojana 7th Hafta

या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते. त्यामुळेच या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः ९ ते १० दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मिडियावर या योजनेबाबत काही अफवा पसरत आहेत की, ही योजना बंद होणार आहे. मात्र, विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. योजनेचा सातवा हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.निवडणुकीच्या काळात या योजनेतील मदत रक्कम वार्षिक ₹१५,००० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत ही रक्कम वाढवली गेलेली नाही. योजना पूर्ववतच असून, शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२,००० मिळतील. यामध्ये ₹६,००० केंद्र सरकारकडून आणि ₹६,००० राज्य सरकारकडून दिले जातात.तथापि, योजनेतील काही निधी ‘कृषी समृद्धी योजना’ अंतर्गत वळवण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे आहे. त्यामुळेच यंदा मदतीच्या रकमेत वाढ झाली नाही.
येथे क्लिक करून बघा या दिवशी मिळणार 2 हजार रुपये