नवीन दर जाहीर
नवीन दार पहा
याआधी ८ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती, जी वर्षभरातील पहिली दरवाढ होती.
एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत रु. १७६२ होती, तर मार्चमध्ये ती रु. १८०३ इतकी होती. आता १ मे रोजी जाहीर झालेल्या नवीन दरांनुसार, तो रु. १७४७.५० ला मिळेल. गेल्या दोन महिन्यांत १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत एकूण ५५.५० रुपयांनी कमी झाली आहे. व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले असले, तरी घरगुती सिलिंडरचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सुमारे १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ६३ डॉलरच्या आसपास आहे. दरम्यान, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवले आहे. त्यामुळे आता पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १० रुपये उत्पादन शुल्क आकारले जाईल. सरकारने स्पष्ट केले आहे की, या वाढीव शुल्काचा बोजा थेट ग्राहकांवर पडणार नाही. गेल्या १५ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.gas cylinder price